कणकवली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती
देवगड : आमच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मी एक पाऊल उचलले आहे. यात मला तुमची साथ पाहिजे असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन आपापसातील मतभेद विसरून मिळालेल्या धमक्यांचा मुकाबला करावा. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येऊन मला मतदान करून हे सिद्ध केले पाहिजे की, आम्ही अल्ला शिवाय कोणाला घाबरत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, आमचे मुस्लिम बांधव आणि बहिणी आणि आमचे वडीलधारी माणसं मला साथ देतील आणि मदत करतील आणि ही निवडणूक जिंकून देतील. मी घेतलेला निर्णय आमच्या हक्कासाठी आहे आणि आम्हा मुस्लिमांना मिळालेल्या ज्या खुल्या धमक्या होत्या त्यांचा मुकाबला करून त्या धमक्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय आला असून आपल्या भागातील जनतेला ही लोकशाहीच्या नावाखाली चाललेली राजेशाही संपवायचे आहे. आणि मला खात्री आहे की आमचे हिंदू भाऊ आणि भगिनी आम्हाला साथ देतील आणि प्रचंड बहुमताने विजय करतील, असा विश्वास कणकवली मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.