8.9 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

उबाठात उमेदवारीची तिकिटे विकतात हे पुन्हा झाले सिद्ध

कणकवली | मयुर ठाकूर : उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट विकतात हे २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा हे सत्य सांगितलं होत. आज २०२४ मध्ये सुध्दा उबाठा सेनेत तेच सुरु आहे. उबाठा मध्ये जी बंडखोरी सुरु आहे त्याच कारण मातोश्री मधून मोठ्या प्रमाणात तिकीट विकली आहेत. जो जास्त मोठी बोली लावेल जो जास्त बॅगा पोचवेल त्याला तिकीट दिले जात आहे.

संजय राजाराम राऊत ने सकाळी उठून बंडखोरी बाबत किती ही आव आणला तरी प्रामाणिक शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेच्या खरेदी विक्री व पक्षात सुरू केलेल्या व्यापारीकरणामुळे प्रामाणिक उबाठा सेनेच्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे. तिकीट ऑक्शन करण्याचे प्रकार आजही सुरूच आहे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी हिंदू धर्मा साठी सर्वांना अंगावर घेतले आहे.हे हया नालायकाला समजणार नाही.कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच काम फडणवीस साहेबांनी केले आहे.त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार म्हणून आहे.त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढविली आहे.तुझ्या मालकाला मच्छर पण मारायला येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारणे त्याची व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घ्यावी.जिहादी हृदय सम्राट म्हणून उद्धव ठाकरे फिरत आहे. महाविकास आघाडी सरकार, ह्याच्या तारखा आणि राऊत हा फार मोठा विनोद झालेला आहे.संजय राऊत 26 तारीखला सकाळ फडणवीस साहेबांना बुके देताना फोटो काढण्यात असेल.परत महायुतीचे सरकार निवडून द्यायचं जनतेने ठरवलेले आहे.

फडणवीस साहेबांना कोना पासून धोका आहे हे निश्चित कळायला पाहिजे.जिहादी प्रेमी तुझ्या सारखा पाकिस्तानी एजन्ट असलेल्या लोकांकडून धोका आहे.तर आदित्य आणि तेजस ठाकरे ला संजय राऊत कडून मोठा धोका आहे हे उध्दव ठाकरे यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

उद्धव ठाकरे सुद्धा काँग्रेस चे मुख्यमंत्री होते. म्हणून शिंदे साहेबांना शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घ्यावा लागला. निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था,सरकार राऊत ला मान्य नाहीत. सर्वच तुला वाईट दिसतात सगळे अर्बन नक्षल चे गुण राऊत मध्ये आहेत.

मंत्री उदय सामंत बोलले ते आरोप नाही तर सत्य आहे.राणे साहेबांच्या नावाची सुपारी ह्याच उद्धव ठाकरेंनी दिली होती. तशीच एकनाथ शिंदे साहेबांसोबत करत होते.उदय सामंत यांनी केले आरोप तपसण्यासाठी उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशी मागणी यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!