कणकवली : नावाज खानी हे काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत. पूर्वी राणे काँग्रेस मध्ये असताना राणे समर्थक म्हणून ते काँग्रेस मध्ये असतील परंतू राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर नवाज खानी हे कधीही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. काँग्रेसच्या बैठकांना,कार्यक्रमाला कधीही उपस्थित राहिलेले नाहीत ते नितेश राणेंचे कार्यकर्ते आहेत. त्याचा पुरावा म्हणून त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे आहेत.तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कणकवली विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागीतलेली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाने प्रतिसाद दिला नाही हे त्यांचे म्हणणे धादांत खोटे आहे व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जाणूनबुजून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आहे. नितेश राणे मुस्लिम समाजा बद्दल आक्षेपार्ह विधाने करत असल्यामुळे मुस्लिम समाजाची मते नितेश राणेना मिळणार नाहीत ती मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळतील म्हणून मुस्लिम मतांचे धृवीकरण करण्यासाठी व नितेश राणेंना फायदा पोहचवण्यासाठी नवाज खानी निवडणूक लढवत आहेत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मुस्लिम समाजाने त्यांचा हा डाव उधळून लावावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांनी केले आहे.