17.9 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

नवीन हर्णे यांचे निधन

कणकवली : शहरातील हर्णेआळी येथील रहिवाशी तसेच वनिता मोबाईल शॉपीचे मालक नवीन विनोद हर्णे (वय ४२) यांचे शनिवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नवीन यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी होते. हर्णे आळी येथील समाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असे. त्यांच्या मितभाषी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. वीज महावितरण कंपनीचे इंजिनियर सचिन व प्राथमिक शिक्षक भूषण यांचे भाऊ,तर सामाजिक कार्यकर्ते गौरव हर्णे यांचे ते चुलत बंधू होत. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!