माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते देण्यात आले निवड पत्र
कणकवली | मयुर ठाकूर : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा कणकवली चिटणीस पदी सिद्धेश प्रकाश वालावलकर यांची निवड पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या लौकीकास साजेसे काम अपेक्षित असून भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाढीसाठी आपले योगदान महत्वाचे ठरणार आहे, असे पत्र माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते देऊन निवड करण्यात आली. ही निवड कणकवली कणकवली शहर भाजपा कार्यालयात पार पडली.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप नलावडे, राजा पाटकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, प्रतीक नलावडे, नवराज झेमणे उपस्थित होते.