जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केली नूतन कार्यकारिणीची घोषणा.
कणकवली : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी सिध्देश खटावकर यांची निवड करण्यात आली कोमसाप चे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा समन्वयक रूजारिओ पिंटो तसेच सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील हौटेल अप्पर डेक च्या सभागृहात आयोजित सभेमध्ये जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची निवड सर्वानूमते करून घोषित केली . कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, जेष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सुचनेनुसार आज कणकवली येथील साहित्यिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची सभा झाली.कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके अध्यक्षस्थानी होते.या सभेमध्ये श्री . मसके यांनी सर्वानुमते कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारि मंडळाची निवड केली
ती पुढीलप्रमाणे… तालुका शाखाध्यक्ष माधव कदम, जिल्हा प्रतिनिधी आर्किटेक्ट, उद्योजक संदिप वालावलकर , उपाध्यक्ष राजस रेगे, खजिनदार डॉ. सतीश कामत, कार्यवाह सिध्देश खटावकर , कार्यकारी मंडळ सदस्य गणेश जेठे, महेश काणेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक करंबेळकर, सौ. निकिता ठाकूर,चिराग बांदेकर ,अमर पवार,तर कार्यक्रम समिती सदस्य पदी सौ. रिमा भोसले,अभय खडपकर , धाकू तानावडे, निलेश ठाकूर , लक्ष्मण नारकर, सौ.गितांजली कुलकर्णी. कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारि मंडळाचे कोमसाप चे संस्थापक मधू मंगेश कर्णिक आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ . प्रदिप ढवळ यांनी अभिनंदन केले आहे.