उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून केला उबाठा पक्षात प्रवेश
कणकवली : सकाळपासूनच माजी आमदार परशुराम उपरकर हे पुन्हा स्वगृही अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत परतणार असल्याचे वृत्त प्रसारती केली जात होती. आज माजी आ. परशुराम उपरकर यांनी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आमदार वैभव नाईक, संजय पडते, मंगेश लोके, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे उपस्थित होते.
यावेळी बाबुल गावडे, आशिष सुभेदार, विनोद सांडव, दीपक गावडे, मंदार नाईक, राजेश टंगसाळी, संदीप लाड, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, नाना सावंत, आबा चीपकर, राजेश टांगसाळी, विजय उपरकर, प्रणव उपरकर यांनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.