आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना सल्ला
कणकवली | मयुर ठाकूर : भारतीय जनता पक्ष हा बिष्णोही गँग आहे असा जावई शोध संजय राजाराम राऊत ने आज सकाळी काढलेला आहे. जेव्हा आम्हाला मैदानात हरवू शकत नाहि तेव्हा अस कायतरी बोलून आपली प्रसिद्धी करून घ्यायची. मग शिवसेना उबाठा ही डी कंपनी आहे अस आम्ही म्हणायचं का ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर उपस्थित केला. यावेळी ते कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे आ. नितेश राणे म्हणाले, हिंदू द्वेष करणं किंवा हिंदूंना टार्गेट करणे, पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं हे सगळं दाऊद गँगचे गुण उबाठा सेनेने घेतलेले आहे. दुसऱ्यांना कोणत्याही गँग ची उपमा देण्यापेक्षा तुमच्या उबाठा सेनेची डी कंपनी झालेली आहे. त्यावर पहिले लक्ष टाका आणि नंतर आम्हाला नाव ठेवा, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
मी राहुल गांधींना फोन केलेला एक तरी रेकॉर्डिंग राऊतांनी जाहीर करावं. मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचा फोन राहुल गांधी घेत नाही. दहा जनपथ च्या ऑपरेटर पर्यंत राऊतांचा फोन जातो आणि इकडे मोठ्या बाता करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीप्रमाणे महाराष्ट्र मधील नेत्यांशी बोलावे. कारण दिल्ली तुमच्याप्रमाणे वर्षानुवर्षे काँग्रेसचे राजकारण बदललेलं नाही. काँग्रेसची प्रत्येक यादी दिल्ली वरून ठरते. कितीही इथे तोंड फाटक्यासारखे बोलत बसलात तरी तूमच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस ची यादी महाराष्ट्रातून ठरत नाही. म्हणून परत परत जाऊन दिल्लीत मुजरा करावा लागणार त्याला पर्याय नाही.
राजन तेलिंच्या पक्षप्रवेशा बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आ. नितेश राणे म्हणाले, दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणीतरी करतात. पहिले परशुराम उपरकर होते, सतिश सावंत होते आता हे राजन तेली आहेत.
उद्धव ठाकरे हे नपुंसक आणी नामर्द माणूस आहे. त्याला हिजडाही म्हणू शकणार नाही कारण तेही आजकाल स्वाभिमानाने जगतात. त्यांना स्वाभिमान मिळालेला आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आम्हाला मैदानात हरवू शकत नाही. आमच्या विरोधात बोलण्याची उद्धव ठाकरेंना हिंमत नाही. म्हणून असे कोण ना कोण आमच्यातले घेऊन तयार करतात. त्यात आम्हाला नवीन वाटत नाही.
सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग मध्ये एक उमेदवार नाही. जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल. एक कडवट शिवसैनिक नाही जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो. हे खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे.
उद्धव ठाकरे ने त्यांचे कितीही पाळीव प्राणी आमच्याकडे सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही त्याची आम्हाला सवय झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा भक्कम आहे. भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लावर समजलं काय आम्ही फायर आहोत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं असा इशारा देखील आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.
येणाऱ्या २४ तासात बघू काय होत. आम्ही पण आहोत तेही आहेत. महायुतीचे जेव्हा फटाके फुटायला सुरू होतील तेव्हा दिवाळीच्या अगोदर फटाके कसे फोडायचे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळेल. म्हणूनच २४ तास वाट पाहू काय होत ते, असही ते म्हणाले.
काल शरद पवार यांनी ईश्वरपूर मध्ये राहून उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानाखाली मारली आहे ? किती दिवस रात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहायचे. आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मीच मुख्यमंत्री बनणार असे बसंगत सुटलेले आहेत. शरद पवार, नाना पटोले, रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी लायकी काय आहे हे आम्ही बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीचे मित्रपक्ष दाखवत आहेत. त्याचप्रमाणे जागा वाटप बाबत वरिष्ठ पातळीवर आणि पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल त्या पद्धतीने उमेदवार जाहीर होतील. ज्या उमेदवारांच नाव यादीत येईल ते सगळे त्या त्या पद्धतीने कामाला लागतील.