3.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

रामगड येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

मालवण : मालवण तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाळू वाहतूक सुरु असताना गेल्या काही दिवसात महसूल विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून मंगळवारी रात्री रामगड येथे वाळूची अनधिकृतपणे वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली. डंपर चालकाकडे वाळू वाहतूक परवाना नसल्याने हा डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास रामगड गावचे हद्दीत वाळू वाहतूक करणारा डंपर (एम एच ०७ ए जे १७१२) हा अंदाजे तीन ब्रास वाळू वाहतूक करत असताना गौण खनिज वाहतूक विरोधी पथकाच्या निदर्शनास आला. हा डंपर अडवून डंपर चालकाकडे पथकाकडून परवान्याची मागणी केली असता परवाना आढळून आला नाही. त्यामुळे हा डंपर पथकाने ताब्यात घेऊन आचरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईत आचरा तलाठी संतोष जाधव ,असरोंडी तलाठी काटे, त्रिंबक तलाठी रविराज शेजवल, पोलीस हवालदार तुकाराम पडवळ, पोलीस पाटील सुनील खरात आदी सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!