3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

महामार्ग प्राधिकरण च्या दुर्लक्षामुळे जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू

हुबरट येथील सर्विस रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्यास महामार्ग प्राधिकरण चे दुर्लक्ष

याच खड्ड्यात अपघात होत करूळ येतील सुबोध कुडतरकर यांचे निधन

कणकवली : महामार्गावर सर्विस रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कणकवली शहर शाखेतील इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असणारे सुबोध तुकाराम कुरतडकर (50 रा. करुळ, मधलीवाडी) यांचे अपघाती निधन झाले. महामार्ग प्राधिकरण अशाप्रकारे जीवघेणे बनलेले खड्डे बुजवण्यास दिरंगाई करत असून गेले काही महिने हुबरट तिठ्याच्या अलीकडे सर्विस रस्त्याला पडलेला हा खड्डा जीवघेणा ठरत असताना देखील हा खड्डा बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. या खड्ड्यामुळेच दुचाकी खड्ड्यात जात सुबोध यांचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान कणकवलीतील म्हस्कर हॉस्पिटल कडील शेट्ये मेडिकलचे मालक श्री शेट्ये हे त्यांच्या पाठोपाठ गाडीने येताना कुडतरकर हे पडलेल्या स्थितीत दिसले. त्यांना तातडीने आपल्या गाडीतून त्यांनी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. सुबोध हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पाश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!