11.3 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

उबाठा च्या कर्जत फार्म हाऊसवर वर काळा पैसा;निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले

कणकवली : सकाळी उठून बेछूट आरोप करायचे खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा राऊत चा धंदा आहे.उमेदवारांकडे १० ते १५ कोटी रुपये पोचले म्हणणाऱ्या राऊत ने एका तरी त्याचा पुरावा द्यावा. बेक्रिंग न्युज साठी अशा खोट्या बातम्या चालवू नये. नंतर कोर्टाच्या नोटीसा मिळतात तेव्हा माफी मागतो किंवा हात जोडून नाक रगडून गिडगीडतो.जर पैसे आले असतील तर त्याचा एक तरी पुरावा दे.

उध्दव ठाकरे यांच्या कर्जत च्या फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी पैसा आला आहे. त्याकडे निवडणूक आयोगाला लक्ष घालावे लागेल.या फार्म हाऊसवर काळा पैसा किती आहे हे निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे मग खर खोट होईल.असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

   कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,मोदी साहेबांनी काय करावे काय करू नये ते सांगण्याची पात्रता या तीनपाट संजय राऊत सारख्या माणसाची नाही. त्याने तशी हिम्मत करू नये.गाव गुंड आणि 420 असलेल्या संजय राऊत ने तोंड सांभाळून पंतप्रधान मोदी यांचेवर बोलावे. चड्डीत राहायचं आणि औकातीत बोलाव.असा इशारा दिला.

आमच्या महायुती सरकारला घटना बाह्य सरकार म्हणायचं आणि त्याच सरकारची सामना च्या पहिल्या पेज वर जाहिराती छापायच्या आणि पैसे घ्यायचे हे धंदे बंद करा. कितीही शेमड्या सारखे रडलात तरी तुम्ही थांबवू शकत नाही .

 काँग्रेस ला सरळ सरळ धमकी दिली आहे अशा सुख्या धमक्या हे दोघे पहिल्या दिवसापासून देत आहेत काँग्रेस यांना भीक घालत नाही.उद्धव ठाकरेच्या भेकडाला आणि संजय राऊत च्या म्याव म्याव ला कोणी ही भीक घालत नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!