सरपंच चैताली ढवळ यांनी मानले भाजप नेते निलेश राणे यांचे आभार
कुडाळ, प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील घोटगे गावात जिल्हा नियोजन, जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये घोटगे बौध्दवाडी ते कोरगावकरवाडी जोडणारा साकव बांधण्यासाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष दादा साईल, माजी जि. प. सदस्य लोरन्स मान्येकर, प. स. बाळू मडव यांनी विशेष प्रयत्न केले. तर या सर्व कामासाठी सरपंच चैताली ढवळ आणि उपसरपंच सचिन तेली यांनी पाठपुरावा केला. या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्धल सरपंच चैताली ढवळ यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.