सावंतवाडी, वेगुर्लेत कारंजे, दशावतार मुर्तीकारांना सबसिडी
सावंतवाडी : संस्थानकालापासून सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणार्या केसरी गावाला “पाण्याचे गाव” असे नाव देण्यात येणार आहे तसेच त्या ठिकाणी येणार्या पर्यटकांना राहण्याची सोय व्हावी यासाठी पाणी पुरवठा योजनेच्या परिसरात २० खोल्या उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान सावंतवाडीच्या मोती तलावात आणि वेंगुर्ले येथे तब्बल साडे तीन कोटी रुपये खर्च करुन लेझर लाईट असलेला कारंजा लावण्यात येणार आहे. तसेच सिंंधुरत्न योजनेमधून मुर्तीकारांना कॉम्प्रेसर आणि दशावतारांना गाड्या घेण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. श्री. केसरकर यांनी आज सिंधुरत्न अंतर्गत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.