3.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला आमदार वैभव नाईक यांचा पाठिंबा

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धनगर समाजास आरक्षण देण्याचे आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून,अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी धनगर असे गृहीत धरून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याबाबत आज संघर्ष समितीने कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आरक्षणाबाबत आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा केली या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार वैभव नाईक यांनी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण देण्याचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी संघर्ष समितीस दिले. यावेळी धनगर समाजातील बांधवांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी सकल धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सिताराम जानकर उपाध्यक्ष लक्ष्मण शेळके, लवू खरवते, खजिनदार महेश वरक,शिवाजी जंगले,शंकर कोकरे, अंबाजी हुंबे,सुरेश देसाई,मालोजी कोकरे,नागेश बोडेकर,संतोष साळसकर,बाळू कोकरे,सुनील वरक, सुनील झोरे,सुनील जंगले,कानू शेळके, भरत झोरे,अमोल जंगले,राजू शेळके,अज्या लांबोर,विलास जंगले शेखर डोईफोडे,संतोष पाटील,भरत गोरे,दत्ताराम जंगले,सुरेश यमकर आदी उपस्थितीत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!