मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री.नवदुर्गा कला क्रीडा मंडळ आयोजित आणि श्री. अनिल कांदळकर व श्री.राकेश परब प्रायोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेत सौ. रसिका प्रमोद पाटील पैठणीच्या मानकरी ठरल्या.
द्वितीय क्रमांक सौ. प्रतीक्षा हळदणकर, तृतीय क्रमांक सौ शैलजा नरसाळे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. 31 स्पर्धेकांनी सहभाग घेतला.सूत्रसंचालन कुडाळ येथील राकेश हळदणकर यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.