यामागे वेंगुर्ला येथील खलनायकाच्या हात
या प्रकरणाची चौकशी करण्याची राजन तेली यांची मागणी
सावंतवाडी : शासनाची योजना असतानाही शालेय शिक्षण मध्ये दीपक सरकारी यांनी वाटेल त्याला सिंधू रत्न मधून ट्रान्सफॉर्मर वाटले आहे कासार्डे या ठिकाणी मायनिंग सारख्या प्रकल्पासाठी एका बिल्डरला 29 लाख रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्म दिला या सर्व प्रकारामागे वेंगुर्ला येतील एका खलनायकाचा सहभाग असून तो खलनायक कोण यासह या योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.दरम्यान
निवडणुका आल्या की केसरकर यांच्या मोठमोठ्या घोषणा सुरू होतात परंतु, कुठेतरी लोकांना मी काहीतरी करतो असे दाखवून पुन्हा एकदा आमदारकी पदरात पाडून घ्यायचं हा त्यांचा कार्यक्रम आता पुन्हा एकदा सुरू झालाय त्यामुळे असा खोटारडा आमदार मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीच पाहिला नाही अशी जोरदार टीका श्री तेली यांनी केली ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की आमचा ताज प्रकल्पाला विरोध नाही मात्र ताज प्रकल्पाला जी 140 एकर जागा लागते त्यातील आम्ही राहत असलेली ज्या जागेत आमची घर व मंदिर आहेत ती सोडावी अशी त्यांची मागणी आहे. परंतु, केसरकर यांच्या त्या हट्टीपणामुळे तो प्रकल्प देखील रखडलेला आहे अशी टीका ही त्यांनी केली
तसेच ते पुढे म्हणाले की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत केसरकर आता म्हणत आहेत की राजघराण्याने सही न केल्याने हा प्रकल्प रकडला आहे. मात्र असे असेल तर एवढे दिवस लोकांची फसवणूक का करत होता असा सवाल करत श्री.केसरकर एक प्रकारे लोकांची जखमेवर मीठ चोळण्याच काम करत होते, अशी टीकाही श्री तेली यांनी यावेळी केली.
दरम्यान मी वरिष्ठांकडे या मतदारसंघाबाबत आढावा देखील घेण्याची मागणी केली आहे त्यानंतर तुम्ही तुमचा उमेदवारीबाबत निर्णय घ्या परंतु लोकांचा असलेल्या या उमेदवाराबाबत रोष पाहून तुम्ही त्यावर योग्य तो निर्णय घ्या, अशी मागणी मी माझ्या वरिष्ठांकडे केल्याची तेली यांनी यावेळी सांगितले. तसेच जो नारायण राणे , शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा होऊ शकला नाही, तो एकनाथ शिंदे यांचा काय होणार, असा सवाल ही श्री.तेली यांनी यावेळी उपस्थित केला.