3.2 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मीडिया समोर जाहीरपणे व्यक्त होणार नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी लोकसभा उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता जो पर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मीडिया समोर जाहीरपणे व्यक्त होणार नाही असे मत व्यक्त केले. राणे यांच्या या उत्तराने उमेदवारी बाबत नेमकं काय चाललंय हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस संजू परब, महेश सारंग, रेश्मा सावंत यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!