24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

चिन्हावरून न्यायालयाने फटकारले

जाहिराती सादर करण्याचे अजित पवार गटाला आदेश

नवी दिल्ली : ‘घड्याळ’ चिन्ह वापराच्या सर्वोच्च राष्ट्रवादी मुद्द्यावरुन न्यायालयाने काँग्रेसच्या अजित पवार गटाला कठोर शब्दांत खडसावले आहे. न्यायालयाने चिन्ह वापरासंदर्भात दिलेल्या आदेशांचे अजित पवार गटाकडून पालन होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.’घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे प्रत्येक जाहिरातींमध्ये नमूद करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्च रोजीच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. मात्र अजित पवार गटाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्या. सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर, ‘आमच्या आदेशाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये,’ असे सांगत न्यायालयाने अजित पवार गटाची खरडपट्टी काढली. अजित पवार गटाच्या बाजूने अॅड. मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. ‘निवडणूक आयोगाच्या आदेशावर स्थगिती नाही, त्यामुळे आम्ही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लिहीत आहोत. फक्त आदेशातील शेवटची ओळ बदलण्यात यावी,’ असे रोहतगी म्हणाले. यावर, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रातील जाहिराती सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या आदेशाचे पालन निवडणुका पार पडेपर्यंत केले जावे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ‘घड्याळ’ चिन्हावरील अजित पवार गटाचा दावा निवडणूक आयोगाने वैध ठरवला होता, तर दुसरीकडे शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!