11.5 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकानी घेतली आम. नितेश राणे यांची भेट!

कणकवली | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांची आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी कणकवली येथे भेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विविध प्रश्न आमदार महोदयांसमोर मांडले. सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.

लढा मंच प्रमुख जेष्ठ शिक्षक श्री.शिवराज सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले. तसेच निवेदन दिले.या भेटीवेळी श्री.शामसुंदर सावंत,श्री.आनंद जाधव,श्री.संतोष जाधव,श्री.धर्मराज धुरत,श्री.महेश गावडे,श्री.शशांक अटक,श्री.सिताराम लांबर,श्री.रामचंद्र वालावलकर,श्री.सुर्यकांत साळुंखे,श्री.संदीप परब,सौ.इंदु डगरे,सौ.शर्वरी सावंत आदी उपस्थित होते.या भेटीचे नियोजन शिक्षक श्री.आनंद जाधव आणि श्री.सचिन जाधव सर यांनी केले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!