7.7 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी महिला अधिकाऱ्यांना बोलणे निषेधार्ह

घाईगडबडीत राजकोटवर पुतळा उभारणे हे आम्हाला मान्य नाही

माजी आमदार परशुराम उपरकर

कणकवली : महायुतीचे सरकार महिलांचा सन्मान करते. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मात्र पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या जनता दरबारामध्ये पालकमंत्र्यांसमोर खाजगी स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन हे एकेरी भाषेत त्यावेळीच्या क्लासवन जिल्हाधिका-यांना, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना आणि एका महिला अधिका-यांना व्हिडिओ मध्ये दिसत आहेत. हे भाजपच्या संस्कृतीला शोभते का ? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

घाईगडबडीत राजकोटवर पुतळा उभारणे हे आम्हाला मान्य नसल्याचेही ते म्हणाले. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालय येथे ते बोलत होते. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अश्या प्रकारची व्यक्तव्य केलेली आहे. पालकमंत्र्यांनी अनिकेत पटवर्धन चे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि आम्हाला पण माहिती आहे. कोणता राजकारणी अकाउंट वर पैसे घेतो का ? एवढी जिल्ह्यातील जनता दुधखुळी राहिलेली नाही. त्यापेक्षा अनिकेत पटवर्धन, आपटे, सर्वगोड यांच्यात संभाषण असलेल्या मोबाईल च्या सिडियार रिपोर्ट काढावे, कोणी कोणाला फोन केले ते काढावे. अनिकेत पटवर्धन ची बाजू पालकमंत्री घेत असताना ते भाजपच्या आमदार, माजी आमदारांकडे यापूर्वी काम करत होते, हे विसरुन चालणार नाही. असा टोला श्री. उपरकर यांनी लगावला.

मी लेचापेचा राजकारणी नाही, मी धमक्यांना घाबरत नाही. आतापर्यंत अनेकजण येवून गेले त्यांना पुरुन उरलो हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. जर पालकमंत्री मेडिकल कॉलेजसाठी पैसे आणले असे म्हणत असतील तर, मुलांना शिक्षणासाठी शिक्षक आहेत का ? सर्वगोड नेहमी मुंबईत असतात, हे नेहमी सांगतो आहे. कार्यालयात शेवटी कॅमेरा लागला आहे. त्याची माहीती पुढील काळात आम्हाला फुटेज घेतल्यावर मिळेल. कणकवली रेल्वे स्टेशनवर १०० फुटी भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. त्या रेल्वे स्थनक सुशोभिकरणाचे लोकार्पन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले मग ध्वज उतरवला कशासाठी ? अभियंत्यांवर कारवाई केव्हा होणार असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

कालचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील झालेला राडा पाहता भाजपचे कार्यकर्ते दिसले. शासनाचा जनता दरबार होता की ? कोणाचा ? कारण भाजपचे कार्यकर्ते व्यासपीठावर दिसत आहेत. या जनता दरबारला शासकीय अधिकारी का उपस्थित राहतात. पालकमंत्र्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. १० कोटी कोण घेत होते? पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. एका जिल्ह्यातील अधिकारी १० कोटी मिळवून देत होते, ते जाहीर करावे. तसेच वल्लभभाई पटेल यांचा पुतळा योग्यरीत्या केला. त्याच पद्धतीने छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा. शिवाजीमहाराजांनी राजकोट समोर स्वतःच्या हातानी किल्ला बांधला आहे. तेव्हढ्याच ताकतीने छत्रपतींचा पुतळा उभारण्यात याला. त्याचबरोबर सावंतवाडी जावई ब्रीज बांधलाय, त्याठिकाणी कोणाची बाग आहे, कोण विकासक आहे? पालकमंत्र्यानी एकदा सांगावे. असा टोला परशुरुराम उपरकर यांनी लगावला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!