10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

पेंडूर देऊळवाडी येथील श्री देव वेताळ मंदिर येथील सभामंडपाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार फंडातून दिला १५ लाखाचा निधी

पेंडुर ग्रामस्थांनी आभार मानत आमदार वैभव नाईक यांचे केले जंगी स्वागत

आ.वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पेंडूर देऊळवाडी येथील श्री देव वेताळ मंदिर येथे आपल्या आमदार फंडातून सभामंडप मंजूर केला आहे. यासाठी १५ लाखाचा निधी दिला होता. रविवारी या सभामंडपाचे दिमाखदार लोकार्पण आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी श्री वेताळ देवतेचे दर्शन घेतले.

          यावेळी पेंडूर ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करून त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.येणाऱ्या निवडणुकीत वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.

       यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी पेंडुर वासियांना दिला. तसेच संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले.

          यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, देवस्थान समिती सचिव अमित कुलकर्णी,सरपंच नेहा परब, शिवसेना महिला तालुका समन्वय पुनम चव्हाण,युवासेना उपतालुकाप्रमुख दर्शन म्हाडगुत, ग्रा.प. सदस्य बाबू टेंबुलकर, वंदेश ढोलम, नेहा परब, लता खोत,शिशुपाल राणे, किशोर पेंडुरकर, निलेश हडकर, मनोज राऊळ,रुपेश आमडोसकर,महेश परब, नितीन राउळ, रामू सावंत, संदीप सावंत, प्रदीप सावंत, संतोष नागवेकर, संतोष परब, महेश राऊत, राजेंद्र गावडे यांसह पेंडूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!