27.6 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

देवगड निपाणी रस्त्यावरील असलदे डामरेवाडी येथील धोकादायक वळण कमी करण्यात यावे 

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने झाडी हटवावी 

सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची मागणी 

कणकवली : देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी प्रवासी शेड येथील धोकादायक वळणावर छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. काही महिन्यांपूर्वी खाजगी बस व कारमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे हे धोकादायक वळण कमी करण्यात यावे . तसेच तातडीने या वळणावरील वाढलेली झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवावी , अशी मागणी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके व ग्रामस्थांनी केली आहे.

देवगड निपाणी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतुक होत आहे. त्यामुळे असलदे गावामध्ये डामरेवाडी येथील वळणावर शनिवारी सायंकाळी कार आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात होणार होता. सुदैवाने दुचाकी चालकाने प्रसंग लक्षात येताच आपली दुचाकी रस्त्याच्या बाहेर घेतल्याने अपघात टळला . त्यामुळे या धोकादायक वळणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करत वळणावर रुंदीकरण व वाढलेल्या झाडीची साफसफाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!