7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तायक्वाँदो कोर्स सुरु

कणकवली : विद्यामंदिर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणासाठी आणि शरीर सौष्ठवासाठी विद्यार्थी हित जोपाणे सद्यस्थितीत महत्वाचे आहे. म्हणून तायक्वाँदो अॅकॅडमी स्थापन करून प्रशिक्षक मंदार परब यांनी तायक्याँदो विषयी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थी व पालकांना महत्व पटवून दिले. या वेळी जेष्ठ शिक्षक अच्यूतराव वणवे यांनी इंग्लिश स्कूलमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम आणि शाळेच्या भौतिक गरजा तसेच विद्यार्थी हित जोपासण्यासाठी खेळांचे महत्व या विषयी विचार मांडले.

शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पालकांना मदतीचे आवाहनही करण्यात आले. मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी समाजात होणारे बालकांवरील अन्याय आणि नैतिक घसरण या विषयी माहिती विषद केली. तसेच खेळांचे जीवनातील स्थान व महत्व विषद करून शाळेच्या भौतिक गरजांविषयी पालकांना मदतीचे आवाहान केले. इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दिव्या राणे यांनी शैक्षणिक प्रगतीला आढावा घेऊन पालकांचे व मान्यवरांचे स्वागत केले. पालकांनी आपले शैक्षणिक विचार मांडून तायक्वांदो उपक्रमांचे स्वागत केले व आभार शिक्षिका सौ. राणे यांचे मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!