-4.8 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

भुईबावडा घाटातील वाहतुक बंद | दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

वैभववाडी : काल झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णता बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आज सकाळपासूनच दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तालुक्यात तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी उशीरा पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे गगनबावडा खारेपाटण मार्ग पूर्णत बंद झाला आहे. आज सकाळपासून दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!