3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

दारू वाहतूक प्रकरणी पंढरपूर येथील एक ताब्यात

इन्सुली एक्साईजची कारवाई ; साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

बांदा : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पंढरपूर येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा आरोसबाग तिटयाजवळ करण्यात आली. विशाल बिभीषण गायकवाड (वय २७, रा.वाखरी, पंढरपूर) असे त्याचे नाव आहेत. त्याच्या कडून दीड लाखाच्या दारूसह चार लाखाची गाडी असा मिळून साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना पत्रदेवी-बांदा आरोसबाग तिठा येथे वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी विशाल गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून दीड लाखाच्या दारू सह चार लाखाची गाडी असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!