20 C
New York
Tuesday, October 21, 2025

Buy now

हळवल फाटा येथे कारला अपघात ; जीवितहानी नाही ; कारचे मोठे नुकसान

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणारी कार ( एम. एच १२ व्ही. झेड ९५५३ ) वरील मागील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. मात्र यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. हळवल फाटा येथे कार आल्यावर मागील टायर फुटला व कार डिव्हायडर वर चढून पलीकडच्या लेन वर येऊन थांबली. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार एका व्हॅगनार कारला मागील बाजूने धडकली. त्यामध्ये वॅगनार कारचे किरकोळ नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस नितीन बनसोडे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पोलीस हवालदार आर. के. पाटील आदि घटनास्थळी दाखल झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!