12.4 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

असलदे गावात आ. नितेश राणेंच्या माध्यमातून सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा – दिलीप तळेकर 

असलदेत ग्रामस्थांच्यावतीने कणकवली भाजपाचे नुतन तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार 

कणकवली : असलदे गावात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. गावातील प्रलंबित असलेली विकासकामे आ. नितेश राणेंच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. या गावात रस्ते , पाणी , वीज याबरोबरच नाविन्यपूर्ण विकास कामे करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. त्यामुळे आगामी काळात या गावातील ग्रामस्थांनी आणि नागरीकांनी विकास कामे करणा-या आ. नितेश राणेंच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. माझ्यावर सत्काराची शाल घातल्यामुळे तेवढीच माझी जबाबदारी वाढलेली आहे. गावाच्या काही प्रश्नांसाठी सातत्याने आपल्या पाठीशी राहिन , असा विश्वास भाजपाचे नवर्निवाचित तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी व्यक्त केला.

असलदेत ग्रामस्थांच्यावतीने कणकवली भाजपाचे नवर्निवाचित तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके व सरपंच चंद्रकांत डामरे यांचा हस्ते शाल, पुच्छगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच भाई मोरजकर , उपसरपंच सचिन परब , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , माजी सरपंच सुरेश लोके , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब , परशुराम परब , शामु परब , विठ्ठल खरात , तळेरे माजी सरपंच दिनेश मुद्रस , शैलेश सुर्वे, महेश लोके , संतोष परब , सुनिल तांबे , बाबाजी शिंदे, पंकज आचरेकर , प्रदीप हरमलकर, प्रकाश आचेरेकर , प्रविण डगरे, मनोज लोके, रघुनाथ लोके , संतोष घाडी , प्रशांत परब , कमलेश पाटील , विजय खरात, सत्यवान लोके , वासुदेव दळवी , बाळकृष्ण परब , अमोल परब , दिनेश शिंदे , सतिश पांचाळ , सुनिल चव्हाण, पत्रकार ऋषिकेश मोरजकर , गोविंद लोके , सत्यवान परब , मधुसुदन परब , महादेव परब , मेहूल घाडी , बापू परब , सुनिल परब , विराज परब , देविदास जांभळे , सुनिल चव्हाण , बाबू जांभळे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!