बस मधील ८ प्रवाशी जखमी : जखमींवर उपचार सुरू
वेंगुर्ले : तालुक्यातील तुळस येथे वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गावर जैतीर मंदिर नजीक मुंबईतला जाणाऱ्या चाकरमान्याच्या खाजगी बसचा अपघात झाला या अपघातात बस मधील ८ प्रवाशी जखमी झाले. या जखमींना तात्काळ वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आज १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शिरोडा वरून मुंबईला जाणारी खाजगी बस तुळस येथे समोरील वाहनाला बाजू देताना भातशेतीत कोसळली. या बस मध्ये ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. यातील मीना सुरेश आडारकर, स्मिता अविनाश आडारकर, सुंदर विष्णू गावडे ( सर्व शिरोडा), विशाखा यशवंत घाडी (पाल), वैशाली महादेव कुडाळकर (वेंगुर्ला), सुगंधा बापू कोचरेकर, बापू पुंडलिक कोचरेकर (फळयेफोंडा), सागर हनुमंत धुरी (आसोली), सुंदर विष्णू गावडे फणसखोल हे प्रवासी जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर दुखापत झालेल्या उभादांडा आडारी येथील स्मिता आडारकर यांना बांबुळी येथे तर पाल येथील विशाखा घाडी याना ओरोस येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर डॉ. संदीप सावंत, डॉ. पवार, डॉ. सत्यम आगलावे, डॉ. शुभम बुधेवार, डॉ.ओमकार जाधव, डॉ. किरण कुंटे व सर्व परिचारिकांनी उपचार केले.