0.3 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

कारची धडक बसून दुचाकीवरील एकाचा मृत्यू

कणकवली : कणकवलीहून ओरोसला जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारची धडक बसली. महामार्गावरील ओसरगाव येथे शुक्रवारी दुपारी २ वा. च्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील लक्ष्मण नागाप्पा लाड (३६, मूळ कर्नाटक, सध्या रा. कलमठ – बाजारपेठ) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार अमर यशवंत पवार (३०, जानवली) आणि दुचाकीवर बसलेले नरेंद्र बाळकृष्ण पाटील हे जखमी झाले. लक्ष्मण, अमर, नरेंद्र हे दुचाकीने (एमएच-०९/ईडब्ल्यू-८७१५) ट्रिपलसीट ओरोसला जात होते. ओसरगाव येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारची (एचआर-७२/एफ-००९०) धडक बसली. अपघातात दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही जखमींना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमींपैकी लक्ष्मण यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. अपघाताची फिर्याद जखमी अमर पवार यांनी दिली. सदरची कार एक महिला चालवत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कार चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!