3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट

सावंतवाडी : येथील राणी पार्वतीदेवी ज्युनि. कॉलेजचे सिव्हील इंजिनिअरींगचे निवृत्त शिक्षक, इंजिनिअर बिल्डर्स दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्र्व्हसिटीने आर्किटेक्चरमध्ये डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देवून गौरव केला.

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्र्व्हसिटीच्या पब्लिक रिलेशनचे विभागाचे प्रमुख (डीन) डॉ. रघुनाथ पाराक्कल आणि राजस्थानच्या टेक्नॉलॉजी युनिव्र्व्हसिटीचे उप. कुलपती आणि भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. के. एस. राना यांच्या हस्ते पदवी देऊन नागवेकर यांना गौरविण्यात आले.

श्री. नागवेकर यांना २०१९ मध्ये जर्मनीतील इंटरनॅशनल पीस युनिव्र्व्हसिटीने पी.एच.डी. पदवी प्रदान करुन सन्मानित केलेआहे. एम्. टेक् व एम्. बी.ओ. या पदव्या सिंधानिया युनिव्र्व्ह सिटीकडून प्राप्त केल्या आहेत. याशिवाय के.डी. के. इंजिनिअरींग कॉलेज नागपूर, प्रेसीडेन्सी युनिव्र्व्हसिटी बेगलेर, गोवा इंजिनिअरींग कॉलेज, वागदेवी इंजिनिअरींग कॉलेज, तेलंगणा, युनिव्हरसल इंजिनिअरींग कॉलेज पालघर, महाराजा इंन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मैसूर या कॉलेजमधून काही विषयांचे ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. तसेच श्री महर्षी वैदिक ज्योतिष महाविद्यालयातून वास्तुआचार्य व अंकशास्त्र या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले आहे. डॉ. दिनेश नागवेकर हे इंस्टिट्युशन ऑफ इंजिनिअर, कौन्सिल ऑफ इंजिनिअरींग व टेक्नॉलॉजी, इंस्टिट्युशन ऑफ सिव्हिल इंजिनिअरींग, अमेरिकन कॉक्रेट इंन्टिट्युट, इंडियन बिल्डिंग काँग्रेस अशा देशातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील वीस संस्थांचे आजीवन सदस्य आहेत. डॉ. नागवेकर यांनी भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, कोलकत्ता, केरळ, राजस्थान, गुजरात वगैरेराज्यातील बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा अभ्यास करुन राजस्थान राज्याच्या नियमावली सर्वोत्कृष्ठ असल्याचे मत नोंदविले आहे. २०२० नंतर महाराष्ट शासनाने आर्किटेक्ट व इंजिनिअर्सना दिलेल्या अधिकारामुळे घर बांधणी क्षेत्रात प्रगती होणार असल्याची नोंदही डॉ. नागवेकर यांनी केली आहे.

डॉ. नागवेकर महाराष्ट शासनाचे परवानाधारक अभियंता, तसेच राष्ट पातळीवरील प्रोफेशनल व सनदी अभियंता असून ४० वर्षात ५०० हून अधिक घरांचे आराखडे केले आहेत आणि एक लाखाहून अधिक चौ. फूटाचे बांधकाम अनेक गृहनिर्माण संस्था उभारुन ३८० ते९०० चौरस फूट दराने विकलेआहे. या त्यांच्या कामाची दखल घेवून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. पांडुरंग फुटकर यांचे हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्र्व्हसिटीचे कुलगुरु व्ही. एल. धारुरकर, पुणे युनिव्र्व्हसिटीचे माजी कुलगुरु डॉ. अशोक थोरात यांचे उपस्थितीत राष्टीय सन्मान पुरस्कार, तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांचे हस्ते सकाळ पेपरचा आयडॉल ऑफ महाराष्ट हा पुरस्कार देण्यात आला आहे. असे एकूण राष्टीय पातळीवरील १३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेआहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!