६० हजार रुपयांच्या ऐवजांसह ३ हजार चोरट्यांनी केले लंपास
अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर गोवा ते मुंबई जाणा-या डॉल्फिन या खाजगी बस ने सोन्याचे व्यापारी भैय्यासाहेब मोतीराम मोरे ( वय ५४ ) रा. चारकोप, कांदिवली हे गोवा ते मुंबई असा प्रवास करत होते. दरम्यान नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये बस जेवण्यासाठी थांबली असताना ते हॉटेल मध्ये जेवायला गेले. तेवढ्यात त्यांच्या बॅगेतील अज्ञात चोरट्याने ६० हजार किमतीचे सोन्याचे नथ व रोख रक्कम ३ हजार काही क्षणात लंपास केल्याची गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कणकवली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरील खाजगी बस ने प्रवास करणारे फिर्यादी भैय्यासाहेब मोरे हे गोव्यात सोन्याच्या विक्रीचा व्यवसाय गेले अनेक वर्षे करत आहेत. गुरुवारी गोव्यात सोने विक्रीचा व्यवसाय करुन डॉल्फिन या खाजगी बसेस ने गोव्यावरुन मुंबईकडे प्रवास करत निघाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या बॅगेत शिल्लक राहिलेल्या सोन्याच्या नथ असलेली बॅग होती.
दरम्यान ही बस मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी थांबली . त्यावेळी भैय्यासाहेब मोरे हे देखील जेवायला गाडीतून उतरले होते. जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडीत गेले असता त्यांच्या बॅग मधून चैन उघडलेली होती. त्यांनी बॅग उघडलेली असल्याने बॅंग मधील सोने आहे का हे शोधले तर त्यातून ६० हजार किमतीच्या सोन्याच्या नथ चोरीला गेल्या होत्या . तसेच बॅगेतून रोख ३ हजार रुपयांची रक्कम देखील चोरीला गेली होती. ताबडतोब श्री. मोरे यांनी कणकवली पोलीसांची संपर्क साधला त्यावेळी ती खाजगी बस कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सर्व प्रवाशांकडे चोरीबाबत विचारणा केल्यानंतर रात्री उशीरा मुंबईकडे रवाना करण्यात आली . मात्र याबाबत भैय्यासाहेब मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कणकवली पोलीसांनी नांदगाव येथील संबंधित हॉटेलच्या तिथे बस थांबली.
त्याठिकाणचा शुक्रवारी पोलीसांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप , पोलीस उपनिरिक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.