9 C
New York
Tuesday, March 10, 2026

Buy now

नाटळ ग्रामसभा राडा प्रकरणी सहा जणांना सशर्त जामीन मंजूर

संशयित आरोपीतर्फे अॅड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

कणकवली : नाटळ येथील ग्रामसभेत पूर्ववैमनश्यातून फिर्यादी ग्रा पं. सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्या डोक्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला व किशोर परब, महेंद्र गुढेकर यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ऋषीकेश मारूती सावंत, रमाकांत लक्ष्मण घाडीगांवकर, अभिषण शामराव सावंत, सुनिल संतोष जाधध, संजय शांताराम सावंत व रमेश रामचंद्र नाटळकर या सहाजणांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी दिले. आरोपीतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

३ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. नाटळ ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्त अध्यक्ष गणेश सावंत हा आपण दिलेल्या पत्रावर तात्काळ उत्तर द्या, असे बोलून तो सरपंचांच्या अंगावर धावून गेला त्यावेळी फिर्यादी दिनानाथ सावंत हे अडवायला गेले. तेव्हा गणेश याने धारधार चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर वार केले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अभिषण सावंत, पद्माकर पांगम, पंढरी पांगम, प्रदीप सावंत यांनी त्याला फिर्यादीला लाथाबुक्क्याने मारहाण केली. साक्षीदार किशोर परब व महेंद्र गुढेकर हे फिर्यादीला सोडविण्यासाठी गेले असता रमाकांत घाडीगांवकर, संचिन सावंत, सुनील जाधव, संजय सावंत, रमेश नाटळकर, अविनाश सावंत यांनी त्याना लाथाबुक्क्याने व प्लास्टिक खुर्त्यांनी मारहाण केली. त्यानुसार १३ आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३. ३५२, ५०४, १४३ १४७, १४८, १४९ व पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी ऋषीकेश सावंत, रमाकांत घाडीगांवकर, अभिषण सावंत, सुनिल जाधव, संजय सावंत व रमेश नाटळकर यांच्यावतीने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपींची २५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!