प्रल्हाद घुले सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक म्हणून सांभाळणार कार्यभार
कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांची राज्य परिवहन पालघर विभागाच्या विभाग नियंत्रकपदी प्रशासकीय बदली झाली. तर आता नव्याने अभिजीत पाटील यांच्या जागी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पदी जालना विभागाचे विभाग नियंत्रक प्रल्हाद नारायण घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अचानकपणे त्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासह पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र दामोदर जगताप, अहमदनगर विभाग नियंत्रक श्रीमती मनीषा चंद्रकांत सपकाळ, तसेच जालना विभाग नियंत्रण नारायण घुले यांचीही प्रशासकीय बदली झाली आहे. या बदली बाबतचे आदेश २३ ऑगस्ट रोजी उशिरा पारित करण्यात आले आहेत. एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दीड वर्षापूर्वी सिंधुदुर्ग विभागाचा कार्यभार स्वीकारला होता. अभिजीत पाटील यांची आता पालघर विभाग नियंत्रक पदी प्रशासकीय बदली झाली असून त्यांच्या जागी प्रल्हाद नारायण घुले हे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.