0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कणकवलीत चोरी ; चोरट्यांनी तब्बल सात फ्लॅट फोडले ; पोलीस घटनास्थळी दाखल

रोख रक्कमांसह सोन्याच्या वस्तू केल्या लंपास

कणकवली : तालुक्यातील जानवली येथील दीक्षा अपार्टमेंट आणि पीजी ग्रुप या दोन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी मध्यरात्री धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये एकूण सात फ्लॅट चोरांनी फोडले आहेत.मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.या धाडसी चोरीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत वृत्त असे की,या सात फ्लॅटमध्ये सावंत यांच्या मालकीच्या एका किराणा दुकानाचा समावेश आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा ही आधार या चोरट्याने घेतल्याने नेहमी रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत गजबजलेली असलेली ही वसाहत गुरुवारी रात्री लवकर झोपी गेल्यामुळे त्याचा फायदा ही चोरट्याने उठवला आहे.


दीक्षा पार्क मधील विजयसिंह सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे दीक्षा पार्क मध्ये दोन फ्लॅट असून एका बाजूला एक आहेत. त्यामधील एका फ्लॅटमध्ये आम्ही राहतो. गुरुवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी आम्ही एक प्लेट बंद करून दुसऱ्या प्लेटमध्ये झोपण्यासाठी गेलो. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास उठलो असता त्या फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला त्यामुळे आम्ही दरवाजा उघडून आत मध्ये पाहिले असता बेडरूम मधील कपाट उघडलेले दिसले असून त्यामधील साहित्य अस्ताव्यस्त करून ठेवलेले होते तसेच त्या कपाटा मधील लॉकर तोडून त्यामधील चाळीस ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व वीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तसेच पाच हजार रोख रक्कम चोरून नेली. त्याचप्रमाणे या चोरीची माहिती इतरांना दिली असता सर्वांनी दिशा पार्क मधील सर्व फेज च्या फ्लॅटची तपासणी केली त्यावेळी इतरही ठिकाणी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले.

त्यामध्ये दिशा पार्कमधील फेज ४ मध्ये राहत असलेले गंगाराम पंढरीनाथ सावंत फेज १ मधील सुजाता संतोष परब सुधीर जाधव तसेच तिथेच राहत असलेले सुरेखा विठ्ठल सावंत यांचे किराणा दुकान चोरट्यांनी फोडले त्याचप्रमाणे दीक्षा पार्क जवळील समर्थ रेसिडेन्सी येथील नीता शिवाजी डामरे अनिल सखाराम तावडे व हनुमंत सखाराम तावडे यांचेही फ्लॅट चोरट्यांनी फोडले. असे म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप उपनिरीक्षक रवींद्र शेगडे अनिल हाडळ यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच शहानपथक व ठसे तज्ञ पी एम माघाडे, हवालदार श्री. सावंत, संकेत खाडये, कमलेश सोनवडे, श्री. जाधव घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती समजताच शुक्रवारी सकाळी कणकवली पोलिसांनी वेगाने तपास करण्यास सुरुवात केली असून नजीकच्या ब्रह्माकुमारी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही वरून मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरटे या रस्त्यावरून जात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे रामचंद्र शेळके व अन्य पोलिसांकडून सुरू आहे.

तब्बल १४ तोळे दागिने लांबविले
कणकवलीतील एस एम हायस्कूल मध्ये कार्यरत असलेले शिक्षक विजय सातपुते यांच्या मालकीच्या फ्लॅट मधील तब्बल १४ तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये सातपुते हे राहत होते.त्या ठिकाणी त्यांचे दोन फ्लॅट असून त्यांच्या बंद फ्लॅटमध्ये असलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

शान पथकाला पाचारण
दीक्षा पार्क आणि परिसरात झालेल्या या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी क्षणपथकाला प्राचारण करण्यात आले होते. पथकाकडून तपासणी करण्यात येत होती. या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान कणकवली पोलिसांसमोर आहे महामार्ग लगत झालेल्या या धाडसी चोरीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!