3.7 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

जोडे मारो आंदोलन करणाऱ्याभाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांना निवेदन

दोडामार्ग : येथील चौकात सोमवारी जोडे मारो आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे,दोडामार्ग चौकामध्ये सोमवारी (ता.१९) भाजपच्या पदाधिकाऱ्याने माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केले होते. त्यामुळे तालुक्यातील सामाजिक अशांतता बिघडण्याचे काम सर्व पदाधिकारी यांनी करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष माजी मंत्री रामदास कदम यांना शिवीगाळ केली.तसेच त्यांच्यावर हल्ला करुन प्रत्यक्ष जोडे मारो आंदोलन करण्याची धमकी दिलेली आहे. पुतळा जाळणे, जोडे मारो अशा प्रकारची हिंसक आंदोलने करण्यास काय‌द्याने बंदी असून अशा प्रकारची कृत्ये करून गावागावात अशांतता प्रस्थापित करणे हा त्यांचा मुख्य उ‌द्देश आहे. या हिंसक आंदोलनात असणारे कार्यकर्ते यांच्यावर यापूर्वी भारतीय दंड संहितेमधील ३०२, ३०७, १४४, १४९ वैगेरे कलमान्वये गुन्हे नोंद असल्यामुळे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यांचे वर्तन कायद्याविरोधात असल्याने तालुका दहशतीखाली जाऊ शकतो. तसे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस निरीक्षक म्हणून आपली राहणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्यावर तत्काळ गुन्हे नोंद करावे अथवा होणाऱ्या परिणामाला आपणच जबाबदार राहाल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर,सावंतवाडी मतदारसंघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई , जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस, तालुका उपप्रमुख तिलकांचन गवस व दादा देसाई, शहरप्रमुख योगेश महाले, सासोली सरपंच बळीराम शेट्ये, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री यांच्या सह्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!