19.5 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

बांद्यात बेकायदा दारूसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साइज पथकाची कारवाई 

बांदा : गोव्यातून मुंबईकडे होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात एक्साईजच्या इन्सुली पथकाने बांद्यात कारवाई केली. यात २ लाख १६ हजार ९६० रुपयांची दारू व ४ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख १६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी संग्राम विक्रम सिंघ (३१, रा. मालाड मुंबई) याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. सदर कारवाई रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.

गोव्यातून जुना बांदा – पत्रादेवी रोड मार्गे बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची माहिती इन्सुली एक्साईज पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळपासूनच या मार्गावर सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणारी कार (एमएच ४७ एन १४२४) तपासणीसाठी आरोसबाग तिठ्यावर थांबविण्यात आली. यावेळी कारच्या मागील डिकीमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे २५ बॉक्स (१२०० बाटल्या) आढळून आल्या. चालकाकडे दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने सदर दारू साठा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख १६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!