रामदास कदम महायुतीचे वातावरण बिघडवीत आहेत
आमच्या नेत्यां विरुद्ध बोलाल तर जशास तसे उत्तर! भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर
सिंधुनगरी प्रतिनिधी : सरकारने अनेक योजना राबविल्यामुळे राज्यभर या सरकार विषयी चांगले वातावरण आहे मात्र शिंदे सेनेचे आमदार व महायुती सरकारमधील वाचाळ वीर नेते रामदास कदम वातावरण बिघडवीत आहेत. भाजपच्या मदतीची शिवाय कोकणातील शिंदे सेनेचे आमदार निवडून येऊ शकत नाहीत. त्यांचा मुलगा योगेश कदम याला पाडण्याची ताकद भाजपमध्ये आहे. भाजप नेत्यांविरुद्ध नाहक आरोप आम्ही सहन करणार नाही त्याला जशास तसे उत्तर देऊ अशा इशारा भाजपा प्रदेशचे उपाध्यक्ष भाजप नेते अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भाजपाच्या मदतीने आमदार झालेले रामदास कदम हे भाजपा नेत्यावर टीका करत आहेत. त्याचे उत्तर भाजपा कार्यकर्ते येत्या निवडणुकीत त्यांचा मुलगा योगेश कदम याला पाडून देणार आहेत. तसेच रामदास कदम हे महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत त्याला भाजपा जाशास तसे उत्तर देईल असे सांगताना कोकणातील शिंदे सेनेचे आमदार भाजपाच्या मदतीशिवाय निवडून येऊच शकत नाहीत त्यामुळे त्यांनी भाजपाशी बरोबरी करू नये असा सल्लाही भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
खरे तर महायुतीचे सरकार आहे. शिवसेना शिंदे आमदार या सरकारमध्ये सामील आहेत मात्र तरीही रामदास कदम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जाहीर टीका करत आहेत. ही टीका त्यांनी तात्काळ थांबविली नाही तर त्याला भाजप जशास तसे उत्तर देईल. आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार भाजपाच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाहीत मग ते योगेश कदम असोत, रत्नागिरीचे पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत असोत की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असोत किंवा कोकणातील अन्य आमदार असोत, हे शिंदे गटाचे सर्व आमदार भाजपच्या मतां शिवाय निवडून येऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. याचे भान रामदास कदम यांनी ठेवावे असा सल्लाही अतुल काळसेकर यांनी दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून त्याला भाजपा नेते रविंद्र चव्हाण जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा असे विधान शिंदेसेनेचे आ. रामदास कदम यांनी केले होते. यावर जिल्हा बँकेत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी श्री काळसेकर म्हणाले की, राज्यात शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात युती आहे. असे असतानाही महायुती मधील शिंदे सेनेचे आ रामदास कदम भाजपा नेत्यावर टीका करून महायुतीत एक प्रकारे मिठाचा खडा टाकत आहेत. महायुतीत राहूनही भाजपा नेत्यांवर ते टीका करत असतील तर जिल्ह्यास राज्यातील भाजपा कार्यकर्त्या त्यांना जसास तसे उत्तर देईल. शिवाय आगामी निवडणुकीत रामदास कदम यांच्या मुलाला पाडणार असल्याचे सांगत रामदास कदम यांच्या विधानाचा काळसेकर यांनी निषेध केला. तसेच शिंदेसेनेचे आमदार हे भाजपा कार्यकर्त्यांच्या मदतीनेच निवडून आले आहे. असे सांगताना कोकणातील शिंदे सेनेचे आमदार भाजपाच्या मदतीशिवाय निवडून येऊच शकत नाहीत त्यामुळे त्यांनी भाजपाशी बरोबरी करू नये असा सल्लाही भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
त्यांनी पालकमंत्र्यांना नाही कुणबी समाजाला दुखवले आहे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली आहे. मात्र ही टीका करून कदम यांनी रविंद्र चव्हाण यांना नाही तर पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाला दुखवले आहे. हा समाज त्यांना निवडणुकीत उत्तर देईल असेही काळसेकर यावेळी म्हणाले.