3.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

कट्टा येथे विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न!         

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचे आयोजन

मसुरे : झुंजार पेडणेकर केंद्र शाळा कट्टा येथे श्री दिलीप रामचंद्र गुराम यानी दिलेल्या आर्थिक सहकार्यातून संपन्न झालेल्या कै. भाऊ गुराम स्मरणार्थ विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यानी समुहगीत सादर केले. प्रारंभी संपदा भाट मॅडम यानी शाळेच्या वतीने हस्ताक्षर, वक्तृत्व, रंगभरण, बडबड गीत वाचन या विविध स्पर्धामध्ये ७५ विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगितले . त्यातील ४५ स्पर्धकाना शैक्षणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकाना प्रशस्ती पत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. त्यासाठी प्रामुख्याने आर्थिक सहकार्य करणारे श्री दिलीप रामचंद्र गुराम यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. तसेच ग्रामपंचायत वरची गुरामवाडी यांचे आभार मानण्यात आले.

माजी केंद्रप्रमुख धुत्रे गुरुजी यानी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा अनेक वर्ष शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत त्या बद्दल कौतुक केले.विस्तार अधिकारी सविता परब यानी पालकाना अनेक मौलीक सूचना केल्या व शाळेतफे होणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.संपदा भाट यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलें सर्व गुणवंत विद्यार्थ्याना शैक्षणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्रे सर्व उपस्थित मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आली.

या कार्यक्रमास सेवांगणचे बाळकृष्ण गौधळी व ग्रंथपाल जांभवडेकर मॅडम यानीही नियोजनात सहकार्य केले या कार्यक्रमास सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच कामतेकर, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर , सेवांगणचे अध्यक्ष बापू तळावडेकर, दीपक भोगटे, सुनील गुराम, गणेश वाईरकर, ग्रा पं सदस्य बाबु टेंबुलकर, वंदेश ढोलम, वालावलकर मॅडम, कुबल मॅडम, गुराम मॅडम, गिरकर मॅडम, आनंद धुत्रे , केंद्र प्रमुख श्रीकृष्ण सावंत, विस्तार अधिकारी सविता परब, तलाठी मॅडम, ठाकूर सर, राधीका जगदाळे, मनिषा बेनके संपदा भाट पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!