जिल्ह्यात सर्वाधिक जास्त ४९ हजार ५९७ प्रकरणे कणकवली मतदार संघातून मंजूर
कणकवली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ लाख ३६ हजार ५२७ प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या संख्येत आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त म्हणजे ४९ हजार ५९७ प्रकरणे मंजूर झाली आहेत.या तुलनेत कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रकरणे कमी आहेत.
आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवली, देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यांमध्ये अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सरपंच, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. त्याची पूर्तता झाल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कुडाळ विधानसभा मतदार संघातून ४३ हजार ९८९, प्रकरणे मंजूर झाले आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून ४२ हजार ९४१ प्रकरणे मंजूर झालेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्येत सर्वाधिक गणना महिलांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदाही सर्वाधिक प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.