-1.8 C
New York
Tuesday, March 3, 2026

Buy now

कणकवलीत दोन तरुणांमध्ये मारामारी

कणकवली : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील तरुणांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून मारामारी झाली. त्यामुळे त्या दोघांपैकी एक तरुण जखमी झाला. ही घटना कणकवली येथे रविवारी घडली.

तालुक्यातील दोन तरुण कणकवली येथे समोरासमोर आले. पूर्वी दिलेल्या पैशांबाबत त्यातील एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला विचारले. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातील एका तरुणाने आपल्या हातातील हेल्मेट दुसऱ्या तरुणावर मारल्याने त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली, रक्तही आले. त्यामुळे जखमी अवस्थेतील त्या तरुणाने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी जखमी तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. याबाबत घटनेची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!