26 C
New York
Monday, July 7, 2025

Buy now

भोसले स्कूलच्या अद्विता दळवी हिचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

सावंतवाडी : जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील अद्विता संजय दळवी हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत विभागीय वक्तृत्व स्पर्धेत स्थान मिळवले आहे. ही स्पर्धा राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, शिक्षणाधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग आणि कुडाळ हायस्कुल व जुनियर कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

वक्तृत्व स्पर्धेचा विषय हा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता व आव्हाने’ असा होता. सदर स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये लेखी चाचणी, भाषण व प्रश्नोत्तर फेरी अशा स्वरूपात घेण्यात आली. शाळेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली शेट्टी यांचे मार्गदर्शन तिला लाभले. अद्विता हिचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!