26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

गणेशोत्सव स्पेशल रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले

कणकवली : गणेशोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत तब्बल १८ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांना थांबे ही भरपूर आहेत. मात्र, चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष गाड्यांपैकी सात गाड्यांचे थांबे वाढविण्यात आले आहेत. हे थांबे पेण आणि सिंधुदुर्गातील झाराप या स्थानकावर देण्यात आले आहेत.

यात सीएसएमटी-सावंतवाडी- सीएसएमटी डेली (०११५१ / ०११५२) या गाडीला पेण आणि झाराप, सीएसएमटी-रत्नागिरी- सीएसएमटी डेली (०११५३ / ०११५४) या गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ-एलटीटी डेली (०११६७ / ०११६८) या गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ-एलटीटी त्रिसाप्ताहिक (०११८५ / ०११८६) गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ- एलटीटी साप्ताहिक (०११६५ / ०११६६) गाडीला पेण, एलटीटी- सावंतवाडी-एलटीटी डेली (०११७१ / ०११७२) गाडीला पेण आणि झाराप, आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या मुंबई सेंट्रल-सावंतवाडी- मुंबई सेंट्रल (०९००९ / ०९०१०) या गाडीला झाराप स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव स्पेशल गाड्यांपैकी रत्नागिरी – सीएसएमटी डेली (०११५४) ही गाडी १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार होती. मात्र, ही गाडी २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. तसेच कुडाळ – एलटीटी डेली (०११६८) ही गाडी १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार होती. ही गाडीही २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावणार असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

*’त्या’ गाड्यांसाठी ७ ऑगस्टपासून आरक्षण सुरू*

रेल्वे प्रशासनातर्फे गणेश भक्तांसाठी ३१ जुलै रोजी आणखी पाच विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात आली होती. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत. एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी द्विसाप्ताहिक (०१०३१ /०१०३२), पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक (०१४४७/०१४४८), रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी साप्ताहिक (०१४४४/०१४४३), पुणे – रत्नागिरी – पुणे साप्ताहिक (०१४४५ /०१४४६), रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी साप्ताहिक (०१४४२ /०१४४१) या पाच गाड्यांची घोषणा झाली. यातील रत्नागिरी – एलटीटी (०१०३२), रत्नागिरी – पुणे (०१४४८), रत्नागिरी – पनवेल (०१४४४), (०१४४६), (०१४४६), (०१४४६) रत्नागिरी – पुणे रत्नागिरी – पनवेल या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम, इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाईटच्या माध्यमातून सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!