11.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांचा कणकवली तालुका खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर पलटवार

“शेतकरी संघ हा शेतकऱ्यांचा आहे, तुमच्या कमिशन एजंटांचा नाही !

कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे काका, वडील हे शेतकरी खरेदी-विक्री संघांचे फाऊंडर मेंबर आहेत., मराठा मंडळ चे देखील फाऊंडर मेंबर आहेत., तसेच त्त्यांचे सामाजिक कार्यात असेल सहकार क्षेत्रात नाईक कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. हे सर्व श्रुत आहे. पण तुमचे नेते मंडळी हे आयत्या बिळा वर नागोबा झालेले आहेत. तुमचे नेते आता मराठा मंडळ चे अध्यक्ष आहेत., शेतकरी खरेदी विक्री “संघ देखील तुमच्या ताब्यात आहे. पण जो वसा शिवराम भाऊ, मनोहर सावंत यांच्यासारख्या महर्षीनी जपला तो वसा तुम्ही जपता आहात काय? यात तुम्ही यशस्वी ठरला आहात काय? हा खरं तर अभ्यास करण्याचा विषय आहे. असा टोला कलमठ युवासेना शहरप्रमुख धिरज मेस्त्री यांनी लगावला आहे. शिवराम भाऊंनी शेतकरी खरेदी संघ हा शेतकऱ्यांनसाठी स्थापन केलेला होता. तो तुमच्या सारख्या एजटांसाठी स्थापन केलेला नाही. त्यांनी जो खरेदी विक्री संघाचा वसा ठेवला आहे तो तसाच रहावा अशी आमची भावना आहे. त्यामुळे कुठचेही गालबोट शेतकरी खरेदी – विक्री संघावर लागू नये ही आमची तळमळ आहे. पण तुमच्या सारखे लोक मधले कमिशन एजट असतील कायमच जेथे कमिशन जास्त मिळत असेल. खत किंवा कीटकनाशके असतील या सारखे खते ठेवली जातात. यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते तसेच त्याची मेहनत ही पाण्यात जाते.

शेतकरी खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी काल स्वतः च सांगितले की कृषी मित्र खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविले आहेत. म्हणजे या खताची गुणवत्ता आधी का तपासली नाही गेली? गुणवत्ता न तपासता तुम्ही हे खत विक्री साठी ठेवले ही तुमची चूक तुम्ही मान्य केली आहात. त्याचबरोबर देवगड खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे ६२ हजार रुपये हे शेतकऱ्यांना मागे दिले गेले आहेत. कणकवलीत जर नुकसान ग्रस्त असतील तर कणकवली खरेदी विक्री संघाला देखील नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यामुळे युवासेनेच्या आंदोलनाला यश आले आहे. तुम्ही तेच खत तुमच्या खरेदी विक्री संघातून विकले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना-युवासेना झगडणार, शेतकऱ्यांनवरती अन्याय करू देणार नाही, त्यामुळे ह्या कृषी मित्र खाताला काळ्या यादीत टाकावं अशी आमची मागणी आहे, अशी मागणी युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!