25.5 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

घुमडे येथे घराची भिंत कोसळलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबीयांना भाजपा नेते निलेश राणे यांचा मायेचा आधार

मालवण  : मुसळधार पावसात घुमडे खालचीवाडी येथील अनिल हरिश्चंद्र बिरमोळे यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी घुमडे खालचीवाडी येथे भेट देऊन नुकसानीची पाहाणी केली. तसेच आर्थिक मदत सुपूर्द केली. घुमडे खालचीवाडी येथे एकत्रित पणे पाच कुटुंबांची घरे आहेत. काही दिवसांपूर्वी मुसळाधार पावसात यातील अनिल बिरमोळे यांच्या मालकीच्या घराच्या मागील बाजूस असलेली संरक्षक भिंत कोसळली. यात घर मागील बाजूने जमीनदोस्त झाले. घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे हे देखील येथेच राहतात. ऐन पावसात घर कोसळल्याने या कुटुंबावर संकट ओढवले आहे. याचं ठिकाणी त्यांचे देवघर होते. त्याचे देखील नुकसान झाले आहे. निलेश राणे यांनी पडझड झालेल्या भागाची पाहाणी करून नुकसानीची माहिती जाणून घेतली. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही बिरमोळे कुटुंबियांना देत मायेचा आधार दिला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच स्नेहल बिरमोळे, माजी सरपंच दिलीप बिरमोळे, माजी नगरसेवक पंकज सादये, राकेश सावंत, अंकित बिरमोळे, निषय पालेकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!