3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

मसुरे मर्डे येथील वीज ट्रांसफार्मर बदलासाठी मसुरे भाजप तर्फे निवेदन…

लवकरच सदर ट्रांसफार्मर बदलून देण्याचे वीज वितरण च्या अधिकाऱ्यांचे आश्वासन….

मसुरे : सुरे मर्डेवाडी येथील डॉक्टर भट यांच्या दवाखान्यां नाहीं असलेला वितरण चा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असून यामुळे येथील वीज ग्राहकांना गेले अनेक दिवस मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सदरच्या ट्रांसफार्मर वरून वीस पुरवठा कमी जास्त होण्याचा प्रकार होत असल्यामुळे येथील वीज ग्राहकांच्या पाण्याच्या वीज मीटर तसेच घरगुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढलेले होते. या नादुरुस्त ट्रांसफार्मर मुळे येथील ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नाबाबत मसुरे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परब, माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण,दिलीप मुणगेकर आदींनी विरण येथील सहाय्यक अभियंता श्री माने याना लेखी निवेदन देऊन या प्रश्नाबाबत लक्ष वेधले. यावेळी शिवाजी परब यांनी सहाय्यक अभियंता श्री माने यांच्याशी लवकरात लवकर ट्रान्स फार्मर बदलण्याची मागणी केली. वीज वितरण येतील सहाय्यक अभियंता श्री माने यांनी सुद्धा या प्रश्नाबाबत त्वरित ट्रांसफार्मर मागवून घेऊन सदर ट्रांसफार्मर बदलून देण्याचे आश्वासन मसुरे भाजपच्या शिष्टमंडळास दिले. ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण यांनी महाराष्ट्र वीज वितरण च्या अधिकारी वर्गाचे आभार मानले. यावेळी मसुरे भागातील वीज वितरण च्या विविध प्रश्नांबाबत शिवाजी परब, जगदीश चव्हाण यांनी चर्चा विनिमय केला..

विरण येथे वीज वितरण चे सहाय्यक अभियंता श्री माने यांना निवेदन देताना शिवाजी परब, जगदीश चव्हाण, दिलीप मुणगेकर आदी मान्यवर ….

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!