मालवण तालुक्यातून १२३८ नागरिकांचे रक्त नमने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे
दोन – तीन दिवसात अहवाल प्राप्त होणार
सिंधुदुर्ग : मागील काळात हत्तीरोगाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मालवण तालुक्यात पुन्हा एकदा हत्ती रोगाचा पॉझिटिव्ह रुग्ण गेल्या महिन्यात सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सन 2014 मध्ये या जिल्ह्यात हत्तीरोगाचा शेवटचा रुग्ण सापडला होता. दहा वर्षांनी पुन्हा हत्तीरोगाचा रुग्ण सापडल्यामुळे गेला महिनाभर आरोग्य यंत्रणा त्या परिसरातील नागरिकांचे तपासणीसाठी रक्त नमुने गोळा करत आहे. 1238 रक्त नमुने या तपासणीसाठी गोळा झाले असून पुणे एनव्हीआय प्रयोगशाळे कडे रवाना झाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात याचा अहवाल प्राप्त होईल. सद्या हत्ती बाधित रुग्ण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहे. तर आरोग्य विभागाची पथके दिवस रात्र कार्यरत झाली आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी किशोर तावडे यानी यासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती. या रोगाबाबत आरोग्य विभागाने त्या ठिकाणी केलेले सर्वेक्षण, गोळा केलेले रक्त नमुने याचा आढावा घेऊन हत्ती रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर संदेश कांबळे आधी या बैठकीला उपस्थित होते.
हत्तीरोग बाधित रुग्णाला क्युलेक्स जातीच्या डासाने चावा घेतला व तो डास इतरांना चावला तर त्याच्या माध्यमातून हत्ती रोगाचा फायदा होतो. या जिल्ह्यात म्हणजे मालवण तालुक्यात 2014 पर्यंत 71 रुग्ण सापडले होते. केंद्र शासन राज्य सरकार व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांनी त्यावेळी एक चळवळ राबवून या रोगावर पूर्णतः नियंत्रण मिळविले होते. सन 2014 नंतर या जिल्ह्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. आता हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे या जिल्ह्यात हत्तीरोगाने शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्वेक्षण व औषध उपचाराचे काम विद्या पातळीवर हाती घेण्यात आले आहे.
जो हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले असून तो रुग्ण बरा झाला आहे. हत्तीरोग बाधित झालेली रुग्ण महिला असून तिच्यावर आरोग्य यंत्रणेचे उपचार सुरू आहे. सद्यस्थितीत तिला कोणताही त्रास नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हत्तीरोग बाधित रुग्णांमध्ये पाय अत्यंत जाड होत जाणे हे लक्षण असून आरोग्य यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर काम करत आहे.
मालवण नगरपालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी सांडपाणी व तुंबलेली गटारे डासांची माहेरघरे ठरत असून याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. नगरपालिकेला याबाबतच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी वा डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाची आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून जोखीम ग्रस्त भागात ही पथके दिवस-रात्र कार्यरत ठेवण्यात आली आहेत.