0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

रक्ताच्या नात्याला काळी मा फासणारी घटना

कणकवलीत परराज्यातून आलेल्या १७ वर्षीय युवतीवर सख्या चुलत भावानेच केला बलात्कार

कणकवली : कणकवली तालुक्यात परराज्यातून कामासाठी आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या चुलत भावाने बलात्कात केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला काही दिवस उलटल्याने आणखीणच खळबळ जनक माहिती उघड झाली. सदरची अल्पवयीन मुलगी ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्या संशयित युवकाला कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने अटक केली आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कणकवली तालुक्यानजीक असलेल्या एका क्रशरवर पीडित युवती आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. काही कारणास्तव युवती आपल्या कुटुंबीयांसमवेत गावी गेली होती. मात्र तिच्या सतत पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान सदर पीडित युवती ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.

प्रकरणी सदर युवतीने दिलेल्या माहितीनुसार पोक्सो कायद्यांतर्गत संशयीत आरोपी विरोधात कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करून शून्य नंबरने कणकवली पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. जानेवारी २०२४ ते जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. त्या युवतीने पहिल्यांदा आपण कामावर राहत असलेल्या ठिकाणी एका युवकाने सातत्याने आपल्यावर अत्याचार केले असल्याची दिशाभूल करणारी माहिती पोलिसांना दिली. मात्र तिच्याकडून संशयित आरोपीचे नाव व अन्य माहिती संशयास्पद मिळत असल्याचे व प्रकरणाची खरी कथा वेगळी असल्याचा संशय तापसी पोलिसांना आला. याबाबत अधिक तपास व माहिती घेण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या युवतीकडे दाखल पोहोचले. तरुणीने दिलेली माहिती संशयास्पद असल्यामुळे व त्यात कोणत्याही प्रकारची सत्यता नसल्याने पोलिसांना खऱ्या आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. या प्रकाराने पोलीस देखील चक्रावून गेले होते.

दरम्यान पोलिसांना या प्रकरणी संशय वाटल्याने पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून माहिती घेतली. त्या पीडित युवतीच्या वडिल व कुटुंबियांकडे कसून तपास केला. त्यावेळी निष्पन्न झाले की, त्या पीडित युवतीच्या चुलत भावानेच तिच्यावर बलात्कार आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ कोल्हापूर येथे राहत असलेल्या ठिकाणाहून अटक केली.

संशयित आरोपीला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची (बुधवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!