14.8 C
New York
Monday, October 20, 2025

Buy now

भर मुसळधार पावसातही कुडाळमध्ये निष्ठा यात्रा सूरु

आमदार वैभव नाईक यांच्याकडून निष्ठावंत शिवसैनिक व नागरिकांच्या गाठीभेटी

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवार पासून मुसळधार पाऊस सुरु आहे.नदी नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ते बंद होत आहेत. परंतु या अतिवृष्टीतही आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यात निष्ठा यात्रा जोमाने सुरु आहे.आमदार वैभव नाईक हे भर पावसात सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बुथवर छोट्या छोट्या बैठका घेत आहेत. नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत त्या तात्काळ सोडविल्या जात आहेत. जसा जसा पावसाचा जोर वाढत आहेत. त्याच पद्धतीने निष्ठा यात्रा अधिक जोमाने सुरु आहे. या गावातून त्या गावात मार्गक्रमण करीत उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे महत्व समजावून सांगितले जात आहेत. शुक्रवारी झाराप, आकेरी, हुमरस, कालेली, मोरे, कांदुळी, आंबेरी, वाडोस यागावात निष्ठा यात्रा पार पडली.निष्ठा यात्रेला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उत्साहाने निष्ठा यात्रेत सहभागी होत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!