0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

बिळवस सरपंच मानसी पालव यांचा आदर्श उपक्रम

मसुरे | प्रतिनिधी : बिळवस दत्त मंदिर येथे शुक्रवारी दुपारी वीज वितरण च्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून बिळवस येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल मृत्युमुखी पडले होते. सुमारे पावणे दोन लाख रुपयाचे नुकसान या गरीब शेतकऱ्याचे झाले आहे. याबाबत बिळवस ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ मानसी पालव या सर्वप्रथम धावून गेल्या होत्या. या गरीब शेतकऱ्याचे शेती हंगामात बैल मृत्युमुखी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत या घटनेची जाणीव ठेवून बिळवस ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच सौ मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभू गावकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, ग्रामसेवक युगल प्रभू गावकर , मनोज पालव, संजय पालव, अरुण पालव, शुभम पालव, राम पालव, लक्ष्मण पालव, मोहन पालव, समीर पालव, राहुल सावंत, श्रीधर नाईक, राजू पालव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत च्या सहकार्याबद्दल चंद्रकांत पाताडे आणि कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!