कणकवली : तालुक्यातील खारेपाटण येथे मच्छिमार्केट नजिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुंबई मटका – जुगार खेळ खेळवत असताना मिळून आल्या प्रकरणी अस्लम फकीर मुकादम ( वय – ५० रा. वालीये – राजापूर, रत्नागिरी ) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अस्लम फकीर मुकादम याच्याकडून १८६० रुपयांची रक्कम व काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उद्धव साबळे व पोलिस कॉन्स्टेबल पराग मोहिते यांनी केली.